Yogeshwari devi laukik v adhyatmika swarup


योगेश्वरी देवी लौकिक आणि अध्यात्मिक स्वरूप

  •     महाराष्ट्रात कोल्हापूर ,माहूर ,सप्तशृंगी तसेच तुळजापूर हि देवीची मुख्य पीठे आणि अनेक उप पीठे असली, तरी अंबेजोगाई स्थित योगेश्वरी देवीचे महात्म काही वेगळेच आहे. अबेजोगाई हे देवीचे मूळ स्थान आहे  असा उल्लेख रुद्रयामल या ग्रंथातील बहुपाष्टकांत आहे.त्यात असे वर्णन आहे कि, ‘मुलादिवासिनी चंब अंबापूर निवासिनी’ अश्या स्तुतीरूप शब्दात योगेश्वरी देवी अम्बाजोगाई चे  मूळपीठ म्हणून असलेल्या ठिकाणी निवास करते असे स्पष्ट म्हटले असून त्याचप्रमाणे ‘सर्व तीर्थ परादेवी तीर्थ दक्षिणत: स्थितः’ अश्या उल्लेखातुनही  योगेश्वरी देवीचे वास्तव्य अबेजोगाईत देवी मंदिर परिसरात दक्षिणेस असलेल्या सर्वतीर्थ नामक तीर्थाचे नाव स्पष्ट केले  आहे . अशी हि मालादिवासिनी देवी म्हणून या अंबे गावच्या जोगाई देवीस ,देवींच्या अन्य स्थानाहून एक वेगळेच महत्व प्राप्त झालेले असून या देवीच्या भक्ती भावाने व आराधनेने वर घेणाऱ्या अराध्याना परडी व पोत या व्रताचे  स्वरूप म्हणून स्वीकार करतात . त्यातही परडी हि त्याचे परीचय चिन्ह समजून योगेश्वरी देवीने आपले हातात जी निरनिराळी आयुधे धारण केलेली आहेत त्यात देवीने एका हातात पात्र ( परडी ) धारण केल्याचा उल्लेख रुद्रयामल ग्रंथातील देवी स्तवनाच्या श्लोकात केले आहे.

    
        "देवीं भक्तजनप्रियां सुवदनां खड्गं च पात्रं तथा
                                                     स्वर्णालंकृतलांगलंसुमुसलंहस्तैर्दधानां श्रियं |"

  
  •      अन्य शक्तीपिठाच्या ठिकाणी असलेल्या  कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार  केलेले हे पात्राचे आयुध दिसून येत नाही . हे वैशिठ्य उल्लेखनीय असून योगसाधनेत मग्न अलालेल्या  देवीचे हे चिन्ह धारण करणे योग्यच असावे कारण भक्तांनीही आपले आयुष्य अशाच प्रकारे योगसाधनेत व्यतीत करावे असे त्यात सांगणे असावे.
  •   योगासाधेस आवश्यक असलेल्या सत्कर्म , सर्धर्म, सुविचार, तसेच सदाचार याचे पोषणाचा संकेत पात्र या आयुधात आहे ,तर खड्ग आणि मुसळ कुकर्म ,कुअचार ,कुविचार आणि अधर्माचे दमन करावे , असे सूचित करतात .

                                                                                         

Yogeshwari devi laukik v adhyatmika swarup and Mahadwar Image
Yogeshwari mandir,Ambajogai ,Mahadwar
                                                                                                                 संदर्भ :योगेश्वरी महात्म्य 

1 comment:

Pages