श्री योगेश्वरी देवी महात्म (लोककथा व स्तोत्र)
देवीची माहिती व उपासना
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयवंती नदी तीरावर अंबाजोगाई या गावात श्री योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे क्षेत्र देवीचे मुळस्थान म्हणून ओळखले जाते. देवीच्या शक्तीपिठापैकी हे मुळपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. श्री योगेश्वरी देवी कोकणवासीयांची कुलस्वामिनी व अंबाजोगाई वासियांचे ग्राम दैवत म्हणूनहि प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते कि श्री योगेश्वरी देवी मंदिर हे अनादिकालापासून आहे व देवीचा अवतार स्वयंभू आहे. रुद्रयामाल या तांत्रिक ग्रंथातून देवीच्या सहस्त्रानामात ‘अंबापूर संस्थाना पातु योगेश्वरी देवी ‘ असा उल्लेकही आहे. त्याचपुढे ‘मुलादिवासिनी चंब अंबापूर निवासिनी’ याचा अर्थ म्हणजे या मुलस्थानी ती अवतार घेऊन निवास करते. ‘सर्वतीर्थ परादेवी तीर्थ दक्षिणतः स्थितः’ त्याचप्रमाणे श्री योगेश्वरी देवीचे वास्तव्य अंबाजोगाई येथे सर्वतीर्थ नावाच्या तीर्थाच्या दक्षिण दिशेस असल्याचे त्यामध्ये उल्लेख आहे.
योगिनी र्हदयदीपिका या ग्रंथत योगिनीचे वर्णनकेलेले ते असे कि ,
आदिशक्ती पार्वतीचे शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यवर जगताला प्रकाशभूत होणाऱ्या आणि ब्रम्हा-विष्णू-महेश्वर आदि देवतामध्ये अंतर्भूत असलेल्या लहान मोठ्या सर्व पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे संबोधले जाते . अश्या या योगीनिमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्यावर अधिपत्य करणारी देवता हि योगेश्वरी आहे . याप्रमाणे योगसाधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणूनही योगेश्वरी नाव प्रचलित झालेले आहे .
शैक्षणिक व अध्यात्मिक वारसा लाभलेल्या संताची भूमी म्हणून ओळखल्या जाणारे अंबाजोगाई गाव आहे. अंबेजोगाई हे शांत गाव असून शिक्षणासाठी अतिशय उत्तम म्हणून ओळखले जाते. उत्तम शिक्षणासह येथे थोर संत हि होऊन गेले. मुकुंदराज महाराज समाधी मंदिर मराठीचे आद्यकवी म्हणून ओळखले जातात. तसेच दासोपंत समाधी स्थान व दासोपंतांची पासोडी दर्शन अंबाजोगाईत आल्यानंतर होते.
सप्तशती पाठातील देवीचे ध्यान
खड्गं पात्रं च मुसलं लांगलं च विभर्तीसा | अख्याता रक्तचामुंडा देवी योगेश्वरी तीच ||
श्री योगेश्वरी देवीचा बीजमंत्र
(या वेदोक्त मंत्राने रोज एक माळ जप करावा) ॐ ऱ्हीं यं यां रुद्र देवत्यै योगेश्वर्ये स्वाहा |
देवीचे ध्यान
देवीं भक्तजनप्रियां सुवदनां खड्गं च पात्रं तथा स्वर्णालंकृतलांगलंसुमुसलंहस्तैर्दधानां श्रियं | विद्युत्कोटीराविन्दुकांतिधवलां दंता सुरोन्मूलिनीम ब्रम्हेंद्राद्यभिवंन्दितां च वरदां योगेश्वरी संभजे ||
देवीची प्रार्थना
देवी योगेश्वरी स्वामिनी अज्ञ बाल मी तुझाच म्हणुनी | लाज राख तु माझी जननी देवी योगेश्वरी स्वामिनी || तुजवीण मज नच त्रिभुवनी मिळो आसरा तुझा निशिदिनी | हीच प्रार्थना अखंड चरणी देवी योगेश्वरी स्वामिनी ||
देवीची गायत्री
श्री योगेश्वरी देवीची आरती करुन मंत्रपुष्पांजलि झाल्यास गणपतीची,लक्ष्मीची,कन्याकुमारिकेची तसेच देवीची गायत्री म्हणतात
रक्तचामुण्डायैच विद्महे | भुतसंहारिन्यैच धीमहि | तन्नो योगेश्वरी प्रचोदयात् ||
सप्तशती पाठातील देवीचे ध्यान
(देवी मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करताच हे ध्यान आपल्याला नजरेस पडते.)
खड्गं पात्रं च मुसलं लांगलं च विभर्तीसा | अख्याता रक्तचामुंडा देवी योगेश्वरी तीच ||
मार्गशीर्ष नवरात्र (जन्मोत्सव)
योगेश्वरी देवी मातेच्या जन्मोत्सवाला मार्गशीर्ष शु.सप्तमी पासून सुरुवात होवून मार्गशीर्ष शु. पोर्णिमेला नवचंडी पाठाचे हवन होते व यादिवशी उत्सवाची सांगता होते.तसेच मार्गशीर्ष पोर्णिमा यादिवशी योगेश्वरी देवीच्या जय घोषात पालखी नगरप्रदक्षिणा करण्यास प्रस्तान करते.
देवीचे अवतार महात्म
श्री योगेश्वरी देवीचा अवतार स्वयंभु असून जागृत देळस्थान आहे .श्री योगेश्वरी देवी कुमारिका आहे .दंतासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी मार्गशीष पौर्णिमेला अवतार घेतला आहे . देवी कोकण वासीयांची कुलस्वामिनी असून अंबाजोगाईतील लोकांची ग्रामदैवत मानले जाते.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा