अन्नपूर्णा देवीचा सोहळा ‘बोडण विधी ’ ANNAPURNA DEVICHA SOHALA “BODAN VIDHI”



BODAN

अन्नपूर्णा देवीचा सोहळा ‘बोडण विधी ’
ANNAPURNA DEVICHA SOHALA BODAN VIDHI

(All information about BODAN)बोडणाबद्दल संपूर्ण माहीती

      कुटुंबात शुभवृद्धी झाल्यावर म्हणजेच मंगलकार्य किंवा प्रसूती झाल्यावर बोडण भरण्याची चाल आहे.  काही कुटुंबात दरवर्षी बोडण भरण्याची प्रथा आहे. 
       गौरीहाराचे वेळी, पूजिलेली अन्नपूर्णा देवी (पार्वती) नववधू आपल्या बरोबर परिगृही आणते.  हि देवी कुलवधुवर कृपादृष्टी ठेऊन तिची संकटे निवारते आणि तिचा संसार वाढीस लावते या श्रद्धेमुळे ‘वंशवृद्धी’ झाल्यावर, त्यची सांगता म्हणून बोडण भरण्याची चाल पडली आहे.  या बोडणासाठी पुजावयाची देवी, म्हणून माहेरहून आणलेल्या देवीस विशेष स्थान असते. 
      घरातील मुख्य सुवासिनी, स्त्री किंवा नववधु, तसेच कुटुंबाबाहेरच्या, मुलाबाळ असलेल्या तीन सुवासिनी व एक कुमारिका अशा पाच स्त्रियांनी मिळून बोडण भरावयाचे असते.  सुवासिनी घरी आल्यावर, तुलसीवृन्दावनाजवळ त्यांना उभ्या करून, प्रथम तुशीची दुध-पाणी घालुन पूजा करण्यात येते.  नंतर सुवासिनी व कुमारिका यांच्या पायावर दुध-पाणी घालून व औक्षण करून त्यांचा स्वागत सन्मान केला जातो.
     बोडणाची जागा प्रथम गाईच्या शेणाने सारवून त्यावर बोडणाची विशेष रांगोळी काढून त्यावर पूजेचा पाट ठेवतात.  पाटावर अक्षता ठेवून त्यावर देवी ठेवावयाची परात ठेवतात.  घरची सुवासिनी देवीला बसण्यासाठी व देकण्यासाठी कनकीची हळद घालून भिजवून बैठक व लोड ( पाटा-वरवंटा ) तयार करून ते परातीत ठेवते.  देवीला घालण्यासाठी कणकेचेच अलंकारही करतात.  तसेच आरतीसाठी पाच दिवे व पाच जणींना वाहण्यासाठी भंडारा तयार करतात. 
BODANALA LAGNARE KANKECHE ALANKAR V DEVE IMAGE
KANKEDCHE ALANKAR V DIVE     नंतर देवीची मूर्ती ताम्हनात घेऊन तिला पंचामृती स्नान घालतात, पूजा करुण तिला परातीत आसनावर ठेवतात.  देवीची पूजा करण्यापूर्वी सुपारीच्या गणपतीची परातीत स्थापना करून त्याची पूजा करतात.  नंतर देवीची पूजा करतात.  देवीला सहा नैवद्य अर्पण करतात.  त्यातील पाच नैवद्य कुमारिका भोजनास घेते.  नैवेद्य दाखवून झाल्यावर कणकेचे बनवलेले दिवे लाऊन ताम्हनात ठेवतात.  सुवासिनी क कुमारिका देखील हळद कुंकू वाहून पूजा करतात व पाचजणी दिव्यांचे ताम्हन धरून देवीची आरती करतात. 
     आरती झाल्यावर हे पाच दिवे परातीत ठेवलेल्या पाच नैवेद्याच्या पानवर ठेवतात.  नंतर घरातील किंवा कोणीही सुवासिनी, कुमारीकेसह पाचजणींच्या हातावर पंचामृत घालतात.  पंचामृत घालताना संध्येच्या पळीला सोन्याची साखळी गुंडाळून प्रथम दुध, दही, तूप, मध, साखर या क्रमाने घालतात.  ओंजळीतील दुध त्या सुवासिनी दिव्यावर सोडतात व दिवे शांत करतात.  मग देवीवर आणखी दुध-दही घालून सर्वजणी परातीत देवीसह ‘बोडण’ म्हणून एकत्र कालवतात. 
     बोडा कालवत असताना ‘देवी तृप्त झालीस का ?’ असे कुमारीकेस विचारतात.  कुमारिकेने ‘होय’असे म्हणेपर्यंत बोडणात पंचामृतातील कुमारिका मागेल तो पदार्थ घालून बोडण कालवतात.  बोडणात बसताना घरची सुवासिनी पूर्व दिशेकडे तोंड करून पूजेला बसते.  कुमारिका तिच्या उजव्या बाजूस बसवतात.  देवी तृप्त झाल्यावर त्या बोडणाचा काही भाग देवीचा प्रसाद म्हणून कुमारिकेच्या हाताने काढून ठेवतात.  हाच अंगारा म्हणून कुटुंबातील सर्व मंडळीस लावतात. घरातील सर्व मंडळी बोडण चालू असताना येऊन नमस्कार करतात.  बोडण दुपारी १२ च्या आत सुरु करून सव्वाबारा ते साडेबारा या वेळेत संपवले जाते. 
BODAN VIDHI V TYACHA PHOTO
BODANCHA PHOTO 
     नंतर बोडणातील देवी बाहेर काढू तिला स्वच्छ धुऊन पुसून तिच्या तोंडात साखर लावून परत घरच्या देवात नेहमीच्या जागी ठेवून देतात.  कालविलेल्या बोडणाचा कोणताही भाग अपवित्र ठिकाणी देवू नये म्हणून सुवासिनी व कुमारिका आपले हाथ त्याच परातीत हाताला पुरण लावून थोड्या गरम पाण्याने धुतात.  नंतर ते सर्व कालवण अंबामाता समजून गाईला खावयास घालतात किंवा ते देवीला पोहचावे या इच्छेने वाहत्या पाण्यात विसर्जित करतात.  त्यायोगे आपली सेवा देवीपाशी रुजू झाली असे मानतात.  यानंतर सुवासिनीची व कुमारिकेची ओटी भरून सर्व मंडळी भोजनास बसतात.
    गर्भवती स्त्री या विधीत भाग घेत नाहीत.  कुटुंबात गर्भवती स्त्री असेल तर बोडण भरत नाहीत.  चैत्र व पौष या महिन्यात व अधिक महिन्यात बोडण भरत नाहीत.  श्री देवीच्या कृपेने सुवंशवृद्धी होऊन कुटुंब प्रगती पथावर राहील व या श्रद्धेने तिचे पुजन करून तिला संतुष्ट करणे हा या कुलाचाराचा हेतु असतो.        

‘बोडण विधीसाठी तयारी’

“Preparation for BODAN Vidhi”


 पूजा साहित्य :- हळद-कुंकू, अक्षदा, वासाची फुले, पाने, लाल फुले, आंब्याचे २ डहाळे, देवांना हार, पंचामृत : साजूक तूप– मध– दुध– दही- साखर, सुपारी-निरांजण-आत्तर-गरम पाणी –गणपतीला कापसाची वस्त्रे- तांब्या, पळी, भांडे- ताम्हन- पीठाचे अलंकार- करंडा दिवे- नुसती साखर घेण्याऐवजि साखर दळून घेतात.  ओटीसाठी – बदाम – खारीक- हळकुंड- प्रत्येकी कुमारीकेसाठी फ्रॉकचे कापड- बांगड्याना पैसे देणे – गजरा, सुवासिक फुले देणे. दुध-दही-तूप-मध-साखर भरपूर घ्यावे कारण ते बोडण कालवण्यास लागते.  नैवेद्य : परातीताल्र पाच (पाच बायका असतात म्हणून) , इतर पाच – (घरातील देव-कुलस्वामिनी (१)- कुलस्वामी (१)-एक बाहेर ठेवण्यास-गोग्रास-ग्रामदेवी) दरवाज्यावर आंब्याचा ढाला लावणे.  बोडणाला बसण्यापूर्वी देवी पुढे विडा–सुपारी-पैसे ठेवणे, व बोडण काशासाठी करत आहोत हे सांगून कार्य वेवस्तीत पार पडावे म्हणून मागणे मागावे व नमस्कार करावा.    

 

‘बोडणाची सुरुवात’“Start of BODAN”

BODANCHI RANGOLI
BODANACHI RANGOLI 

      बोडणाची सर्व तयारी (वस्तू) जवळच ठेवाव्यात.  प्रथम गणपती परातीत मांडावा.  गंध-हळद-कुंकू-फुल वाहून पूजा करावी.  गुळ-खोब्र्याचा नैवेद्य दाखवावा.  नंतर परातीत अन्नपूर्णा देवी अक्षदात ठेवून त्यात मांडावी.  हळद-कुंकू-गंध-अक्षदा वासाचे फुल वाहून पूजा करावी, पंचामृति स्नान घालावे.  नंतर कोमट पाण्याने स्नान घालावे-नंतर देवीला पुसून घ्यावे व परतीतच जरा बाजूला अक्षदा ठेवून त्यावर कणकेचा पाट ठेवावा-त्य्वार देवीला आसनस्थ करावे.  गंध-अक्षता-हळद-कुंकू-वासाची फुले वाहावीत.  कणकेच्या करंड्यात दुध ठेवावे.  देवीला विडा-सुपारी ठेवावी.  दुधाचा नैवेद्य दाखवाव.  नंतर निरांजण-धूप-उदबत्ती दाखवून ओवाळावे.  केळीच्या छोट्या पानावरील पाच नैवेद्य परातीतच सर्व बाजूनी ठेवावेत.  परतीतच कणकेचे दिवे सर्व बाजुनी लावून ठेवावेत.  देवीची आरती करावी.
     परातीतले लावलेले दिवे दुधाने शांत करावेत (फुंकर घालू नये ) बोडण कालवावयास सुरुवात करावी.  कुमारीकेस हवं नको विचारून ते बोडणात घालावे.  बोडण पूर्ण झाल्यावर त्यातील अंगारा म्हणून थोडे काडावे.  घरातील सर्वांनी देवीला नमस्कार करावा. 
     नंतर अन्नपूर्णा देवी काढून देवीच्या अंगाला पुरण लावून गरम पाण्याने स्नान घालावे.  नंतर पुसून देवार्यात हळद-कुंकू-फुले वाहून ठेवावी व देवीच्या तोंडाला थोडी साखर लावावी.  प्रथम बोलावलेल्यांना जेवण वाढावे व नेहमी प्रमाणे सहभोजन घ्यावे.

बोडणाची आरती’
“Arti Bodanchi”


     जयदेवी जयदेवी जय अंबामाते तुमचा मी आज खेळ मांडीते ||धृ.|| सुवासिनीकुमारी ह्या आल्या सदना | पाय धुवूनी करिते औक्षणा | कुंकुम श्रीफळ देवूनी ओट्या हि भरिते | लीन होऊनी वंदन करितो ||१||
जयदेवी जयदेवी |
आवड तुम्हा मोठी पंचामृताची | तशीच आहे पुरणा वरणाची | दुध, दही, तूप, मध, शर्करा नच कमिते ते | तृप्त होऊनी चेळे तु माते ||२ ||
जयदेवी जयदेवी |
सुवासिनी कुमारी बसती प्रेमे भोजना | त्यासी अर्पिते विडा दक्षिणा | भक्ती भावे केला खेळ मानुनी घेई | सौभाग्य समृद्धी सकला देई ||३ ||
     जयदेवी जयदेवी जय अंबामाते तुमचा मी आज खेळ मांडीते |

सौजन्य :- कवी – सौ.इंदिरा गणेश घाणेकर

विशेष सूचना :- 1. बोडण हा विधी चातुर्मास, पोष व चैत्र महिन्यात     करत नाहीत.

2. घरात गर्भवतीस्त्री असल्यास बोडण भरत नाहीत. 
3. मंगळवार-शुक्रवार किंवा रविवारी चांगला दिवस पाहून बोडण भरावे.
             

श्री श्रीकृष्ण ल. टिळक संपादित (चितपावन दर्शन)
*चित्पावनविषयी सर्व काही माहिती असलेल्या पुस्तकामधून साभार*         
बोडण भरण्याची सोय केली जाते. 
CLICK HERE         
BODANALA LAGANARI RANGOLI IMAGE
BODANLA LAGANARI RANGOLI 

39 comments:

  1. छान उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद ।

    ReplyDelete
  2. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रथेचे जतन करण्याचा स्तुत्य उपक्रम. धन्यवाद

    ReplyDelete
  3. माहिती चांगली परंतु शुद्ध लेखनाच्या चुका अफाट कोकणस्थानेच लिहिले आहे का

    ReplyDelete
  4. Very useful information for new generation who stay away from perental house.

    ReplyDelete
  5. Khup Chan Karan ha vidhi ata vismaranat gelay.
    Bodan kas kartat he ata far kami janana mahit asel.
    Aaplya mahiti baddal dhanyawad

    ReplyDelete
  6. अतिशय सविस्तर उपयोगी माहिती

    ReplyDelete
  7. Khoop Sunder Mahiti. DhanyawaD

    ReplyDelete
  8. Khup chaan mahiti sangitli aahe.

    ReplyDelete
  9. Khup chhan mahiti ahe. Mi mangalvarich kele hote. Fakt bhandaryache mi kadhi aikale navhate. Typing mule ashuddh Marathi aalay. Te durust vhayala have. Kokanasth brahmananche lekhan vatat nahi. Tarihi dhanyavaad.

    ReplyDelete
  10. Khup Chan mahiti. Sarva shankache nirsan zale.

    ReplyDelete
  11. Mahiri khuach ani upaukta. Pan mala 1 prashna ahe. He sarva kalavnyamage kay shastra ahe?

    ReplyDelete
  12. तुम्ही दिलेली बोडणाची माहिती खूप आवडली.एकाच वेळी आई लेकी,सासु सुन किंवा जावा जावा बसलेल्या चालतात का? आणि दुसरं म्हणजे रांगोळी काढताना दाखविली असती तर छान वाटलं असतं.

    ReplyDelete
    Replies
    1. आई,लेक.सासु,सून. जावा जावा.बहिणी,बहिणी नाही चालत.

      Delete
  13. Navin pidhila upaukta mahiti. Mahiti changli aahe. Mi ase aikale aahe ki jya gayila bodan detat ti suddha garbhvati (pregnant) nako.

    ReplyDelete
  14. Khoope chaan mahiti Dhanyavad

    ReplyDelete
  15. फार उपयुक्त मीहीती. समाजरचना विधी चालीरीती व संकल्प ह्ची ओळख नवीन पिढीला होणं आवश्यक आहे. म्होणून विशेष ऊपयुक्त.

    ReplyDelete
  16. घरात मोठ माणूस जर मरण पावल असेल तर वर्षाच्या आत बोडण भरु शकतो का?

    ReplyDelete
    Replies
    1. वार्षिक बोडण आहे का?

      Delete
  17. खूप छान माहिती.

    ReplyDelete
  18. Mahiti k harach chhan pan vicharlelya prashnanchi Uttar milale tar bare hotil eka veles don Bodan bharayachi astil tar kalavatanna kas kalvayach

    ReplyDelete
  19. एकादशी ला बोडण भरत नाहीत का

    ReplyDelete
  20. Very nice information about Bodan.

    ReplyDelete
  21. उत्तम माहिती।

    ReplyDelete
  22. Good information.nanand-bhavjay chaltat ka?

    ReplyDelete
  23. अतिशय उत्तम माहिती आहे धन्यवाद

    ReplyDelete
  24. ज्या प्रथांच्यामागे शास्त्र नाही अशा प्रथा बंद केलेल्या वा त्यात बदल करून सुरू ठेवल्या पाहिजेत.

    बोडण विधीत देवीला तृप्त करण्यासाठी म्हणून कालवलेलं गेलेलं अन्न वाया जात.किमान माझा तरी तसा अनुभव. कारण शहरात गाय पाळलेली नसते. अन्यत्र ते गो मुखी लागावे म्हणून प्रयत्न केला तर त्यांचे मालक नाही म्हणतात.

    अन्नाची नासाडी होता कामा नये.... कोणाच्यातरी मुखी ते लागलं पाहिजे.

    बदल असा करता येईल की देवीची पूजा करावी आणि बोडण म्हणून जे पंचामृत पदार्थ आहेत ते कोणाला तरी दान करावेत.

    ReplyDelete
  25. अतिशय उत्तम माहिती दिली आहे

    ReplyDelete
  26. Chan mahiti. Pan ek prashn aahe. Nanand bhawjay ektra karu shaktat ka

    ReplyDelete
  27. Sankashti chaturthila bodan bharata yete ka

    ReplyDelete
  28. बोडण विधी बद्दल माहिती मिळाली. पण बोडणाची प्रथा कधी, कशी, कोणाकडून सुरू झाली, त्या मागे काय अर्थ आहे हे सांगितले असते तर बरे झाले असते. शुद्धलेखना च्या चुका दुरुस्त करता येतील का?

    ReplyDelete
  29. दोन बोडण एकदम करायचे आहेत तर कसे असतात विधी?

    ReplyDelete
  30. सुंदर माहिती दिली आहे

    ReplyDelete

Pages