Shri Yogeshwari devi Arti, Arti Ambjogaichi ( श्री योगेश्वरी देवी आरती, अंबाजोगाई )


Shri Yogeshwari Devi Arti, Ambajogai 


( श्री योगेश्वरी देवी आरती, अंबाजोगाई )

Shri Yogeshwari Devi Arti,  Arti Ambajogaichi
Shri Yogeshwari devi Arti, Ambajogai    

कोणतीही आरती करण्यापूर्वी आपण गणपती ची आरती करतो त्याचप्रमाणे प्रथम श्री गणेशाची आरती 

( Ganpatichi Arti ) व श्री योगेश्वरी देवी ची आरती ( Shri Yogeshwari devichi arti ),  करतात.  योगेश्वरी दर्शनाला आल्यानंतर भक्त आपला अभिषेक, भोगी (साडी ओटी)  करून सभामंडपात आरती करतात.  तसेच देवीची  आरती हि ठीक दुपारी १२: ०० च्या दरम्यान होते.  त्यादरम्यान अतिशय उत्सहाने भक्त आरतीला उपस्तीत असतात व देवीचा नगाराही त्यावेळेला ऐकवायला मिळतो. आरती झाल्यानंतर आरती होमकुंडा कड़े जाते व नंतर लगेच आरती सर्वाना मिळते.  आरतीवेळेला अंदाजे १० ते १५ मिनिट दर्शनाला गाभार्यात जाता येत नाही.  पण आरती झाली की लगेच देवीचे दर्शन गाभार्याच्या आत जाऊन घेता येते.  

आरती अंबाजोगाईची (ambajogai chi arti )  

>>>> yogeshwari devi ,ambajogai ( mahiti, arti, Niwas, darshan )<<<<<


गणपतीची आरती ( Ganpatichi arti )

।। श्री गणेशाय नमः ।।

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माल मुक्ताफळाची || ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मनकामना पुरती || 
लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ||
३ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
जय देव जय देव ||




shri Yogeshwari devi chi Arti, Ambajogai 

Aarti ambajogaichi   श्री योगेश्वरी देवी आरती, अंबाजोगाई  

 धन्य अंबापूर महिमा विचित्र | पार्वती अवतार योगिनी क्षेत्र | 
दंतासुरमर्दोनी केले चरित्र | सिध्दांचे स्थळ ते महापवित्र |
जय देवी जय देवी जय योगेश्वरी | महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी |
जय देवी जय देवी |
पतित पावन सर्व तीर्थ महाद्वारी | माया मोचन सकळ माया निवारी
साधका सिद्धीवाणेच्या तिरी | तेथील महिमा वर्णू न शके वैखरी
जय देवी जय देवी जय योगेश्वरी | महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी |
जय देवी जय देवी |
सिद्ध लिंग स्थळ परम पावन | नृसिंह तीर्थ तेथे नृसिंह वंदन
मूळ पीठ रेणागिरी नांदे आपण | संताचे माहेर गोदेवी स्थान !
जय देवी जय देवी जय योगेश्वरी | महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी |
जय देवी जय देवी |
महारुद्र जेथे भैरव अवतार | कोळ भैरव त्याचा महिमा अपार
नागझरी तीर्थ तीर्थाचे सार | मार्जन करिता दोष होती संहार
जय देवी जय देवी जय योगेश्वरी | महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी |
जय देवी जय देवी |
अनंत रूप शक्ती तुझ योग्य माते | योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते
व्यापक सकळा देही अनंत गुण भरिते | निळकंठ ओवाळू कैवल्य माते |
जय देवी जय देवी जय योगेश्वरी | महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी |
जय देवी जय देवी जय ||


3 comments:

  1. धन्यवाद, खूप छान माहिती मिळाली,
    देवीचं एखादा पुस्तक असेल तर कृपया कळवावे

    ReplyDelete
  2. देवी ला काही विशिष्ट पदार्थांचा नैवेद्य दाखवतात का?

    ReplyDelete
  3. Hemantkumar Shashikumar Dikshit15 September 2024 at 08:46

    आरती कळायला सोपी नाही. आदरे वंदन.

    ReplyDelete

Pages