श्री योगेश्वरी देवी मातेचा जन्मोत्सव मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव, अंबाजोगाई

श्री योगेश्वरी देवी मातेचा जन्मोत्सव


श्री योगेश्वरी देवी मातेचा जन्मोत्सव :-

    

     कुलदेवी कुलस्वामिनी श्री योगेश्वरी देवी मातेचा जन्मोत्सव मार्गशीर्ष शुध्द सप्तमीला सुरवात होऊन मार्गशीर्ष शुद्ध पोर्णिमा या मंगल प्रसंगी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव साजरा होतो.  देवी मंदिरामध्ये या उत्सव काळात  दुर्गासप्तशतीपाठ , कुंकूमार्चन, सहस्रनामपाठ, श्रीसूक्त अभिषेक, महानैवेद्य, कुलाचार सेवा होत असतात.  मार्गशीर्ष उत्सव मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला नवरात्र सुरवात होऊन मंदिर प्रशासनातर्फे (योगेश्वरी देवल कमेटी, अंबाजोगाई )  शासकीय पूजेचे आयोजन केले जाते. पहिल्या दिवशी पूजन करून ब्राह्मणांना सप्तशती पाठची व श्री योगेश्वरी सहस्त्रनाम व जपाची वर्णी दिले जाते. त्या प्रमाणे दररोज धार्मिक कार्यक्रम मंदिरात होत असतात. पौर्णिमेच्या मंगल प्रसंगी सप्तशतीपाठचे हवन होते. हवन झाल्यानंतर मंदिर गाभार्यात देवीचे पूजन साडी ओटी व महाआरती होते. 
   

    देवी मातेच्या कथेत असे म्हटले जाते कि, देवी मातेने अवतार स्वयंभू आहे. दंतासुर नावाच्या असुराचा वध करण्यासाठी देवीने मार्गशीर्ष पौर्णिमेला अवतार घेतला आहे.  त्यामुळे श्री योगेश्वरी देवीचा जन्मोत्सव  मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध सप्तमी ते पोर्णिमा या मंगल प्रसंगी साजरा होतो.  
     

     श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष उत्सवात लाखो लोक मंदिरात मातेच्या दर्शनाला दूरदूरहून येत असतात.  उत्सव अतिशय आनंदी व प्रसन्न वातावरणात साजरा होतो.  या जन्मोत्सवात आराधि लोक  कोणी नऊ दिवस, कोणी पाच दिवस तर कोणी एक दिवस देवीच्या परिसरात आराध म्हणून बसतात.  या उत्सवात देवीची गाणी, पाउड, भजन, भक्तिगीतांनी व गोंधळी वाद्यांनी भक्तांचा उत्साह अधिकच वाढवीत असतात.  उत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पौर्णिमेस होम हवन पूर्णाहुती झाल्यानंतर आराधी भक्त परत आपल्या घराकडे परतात.  अश्या प्रकारे उत्सवाची हे दिवस कसे आनंदमय जातात हे समजत नाहीत. अश्या प्रकारे देवीचा उत्सव साजरा होतो.  अश्या मोजक्या शब्दात उत्सवाचे स्वरूप आपणासमोर ठेवले आहे. 
 

No comments:

Post a Comment

Pages