Yogashwari Devi, Ambajogai All Information,yogeshwari devi mandir, yatriniwas, bhaktaniwas, Hotels,loudges, devichi arati, shrisukta, lakshmisukta, Images, devi stotra, kawach, mahima, dhyan, loukik v adhyatmik swarup, yogeshwari devichi upasana, etc.
नमस्कार,
मी पुरुषोत्तम गुरुजी औसेकर रा. अंबाजोगाई असून मी वंशपरंपरागत श्री योगेश्वरी देवी मंदिरात क्षेत्रोपाध्याय व कोकणस्थ ब्राह्मणांचा उपाध्याय म्हणून कार्य करत असतो याची सर्वदूर ख्याती भक्तांना मिळत आहे. देवी मंदिरात क्षेत्रोपाध्याय म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली हे परम भाग्य आमच्या परंपरेतून मला लाभले. देवी मंदिरातील धार्मिक पूजाविधी सेवा गेली काही शतकांपासून वंशपरंपरागत आम्ही अखंडित पणे चालू ठेवली आहे. देवी चरणी अभिषेक पूजा, नैवेद्य, सवाष्ण,ब्राह्मण व कुमारिका भोजन, बोडण भरणे, कुंकुमार्चन, सप्तशती पाठ, पाठत्मक व हवानात्मक नवचंडी, वार्षिक सेवा ( मासिक अभिषेक, सप्तशती पाठ ), कुलाचार सेवा, भोजन ई. धार्मिक पूजा विधी देवी मंदिरात सातत्याने आम्ही करत असतो. या सेवा कार्यातून येणाऱ्या भाविक भक्तांना आमची ओळख होऊ लागली. पूर्वी मोजकीच कोकणस्थ भक्तांना कुलस्वामिनी श्री योगेश्वरी देवी हि आपली कुलदेवता आहे याची माहिती होती. ते येथे आल्यानंतर आपली सोय होईल का प्रश्न पडत होता. ते येथे आल्या नंतर त्यांची योग्य सोय व धार्मिक कार्याची माहिती देऊन व सर्वप्रथम त्यांचे समाधान हेच पार्थमिकता आम्ही समजून आम्ही या कार्याचा श्री गणेशा केला.बऱ्याच भक्तांना आपली कुलदेवता माहित नव्हती. देवी दर्शनाला येणारी कोकणस्थ मंडळी आपल्या कुलस्वामिनी श्री योगेश्वरी देवी व येथील सोई बद्दल आपल्या कुटुंबियांना व कुलस्वामिनी भक्तांना सांगून याचा खऱ्या अर्थांने प्रचार व प्रसार करण्यास सुरुवात झाली. या माध्यमातून भक्तांना माहिती मिळत गेली. याचे सर्व श्रेय प्रामुख्याने भक्तांना जाते. भक्तांची श्रद्धा व भक्ती शब्दात सांगता न येणारी आहे. या श्रद्धेचा आमच्या कडून कधीही अपर्हास होणार नाही याची परिपूर्ण काळजी आम्ही सातत्याने घेतो. येणारी भक्तगण त्यांचे योगेश्वरी मंदिर व अंबाजोगाईत आम्ही स्वागत करतो.
श्री योगेश्वरी देवी मंदिरातील धार्मिक पूजाविधीसाठी व सेवा कार्याच्या माहितीसाठी संपर्क साधावा
Call | 9028272001 (Whatsaap) / 8669111515 |
---|
श्री योगेश्वरी देवी चरणी सप्तशती पाठ तसेच पाठत्मक व हवनात्मक नवचंडी आपणाला करता येते.
श्री योगेश्वरी देवीस अंबाजोगाई येथे आल्यानंतर अन्नपूर्णा देवीचे वार्षिक बोडण व कार्याचे बोडण करण्यची सोय होते.
श्री योगेश्वरी देवीस दर महिन्याच्या कोणत्याही एका तिथीस अभिषेक तसेच कुंकुमार्चन तसेच दुर्गासप्तशती पाठ करून प्रसाद पाठवण्याची सोय होते.
संपूर्ण अश्विन व मार्गशीर्ष जन्मामोत्सव कुलधर्म कुलाचार सेवा व अधिक माहितीसाठी खालील बाजूस दिलेल्या फोन किंवा व्हाटस~पवर संपर्क साधावा
श्री योगेश्वरी देवी पादुकेला संकल्प पूर्वक षोडषोपचार पूजा श्रीसूक्त (१, ११ ,१६ आवर्तन )अभिषेक शास्त्रोक्त पद्धतीत होतो.
श्री योगेश्वरी देवीस नैवेद्य अर्पण करून सवाष्ण,ब्राम्हण,कुमारिका तसेच प्रसादाच्या भोजनाची सोय होते.
श्री योगेश्वरी चरणी सहस्त्रनामपाठ व अष्टोत्तरशत नामावली पठनपुर्वक देवीच्या पादुकेला कुंकुम अर्चन होते.
देवीस नववारी किंवा सहावारी साडी अर्पण करून खना नारळाने ओटी भरतात.देवी कुमारिका असल्याने मनी मंगळसूत्र जोडवी वाहण्याची प्रथा नाही.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयवंती नदी तीरावर अंबाजोगाई या गावात श्री योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे क्षेत्र देवीचे मुळस्थान म्हणून ओळखले जाते. देवीच्या शक्तीपिठापैकी हे मुळपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. श्री योगेश्वरी देवी कोकणवासीयांची कुलस्वामिनी व अंबाजोगाई वासियांचे ग्राम दैवत म्हणूनहि प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते कि श्री योगेश्वरी देवी मंदिर हे अनादिकालापासून आहे व देवीचा अवतार स्वयंभू आहे. रुद्रयामाल या तांत्रिक ग्रंथातून देवीच्या सहस्त्रानामात ‘अंबापूर संस्थाना पातु योगेश्वरी देवी ‘ असा उल्लेकही आहे. त्याचपुढे ‘मुलादिवासिनी चंब अंबापूर निवासिनी’ याचा अर्थ म्हणजे या मुलस्थानी ती अवतार घेऊन निवास करते. ‘सर्वतीर्थ परादेवी तीर्थ दक्षिणतः स्थितः’ त्याचप्रमाणे श्री योगेश्वरी देवीचे वास्तव्य अंबाजोगाई येथे सर्वतीर्थ नावाच्या तीर्थाच्या दक्षिण दिशेस असल्याचे त्यामध्ये उल्लेख आहे.
योगिनी र्हदयदीपिका या ग्रंथत योगिनीचे वर्णनकेलेले ते असे कि ,
आदिशक्ती पार्वतीचे शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यवर जगताला प्रकाशभूत होणाऱ्या आणि ब्रम्हा-विष्णू-महेश्वर आदि देवतामध्ये अंतर्भूत असलेल्या लहान मोठ्या सर्व पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे संबोधले जाते . अश्या या योगीनिमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्यावर अधिपत्य करणारी देवता हि योगेश्वरी आहे . याप्रमाणे योगसाधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणूनही योगेश्वरी नाव प्रचलित झालेले आहे .
शैक्षणिक व अध्यात्मिक वारसा लाभलेल्या संताची भूमी म्हणून ओळखल्या जाणारे अंबाजोगाई गाव आहे. अंबेजोगाई हे शांत गाव असून शिक्षणासाठी अतिशय उत्तम म्हणून ओळखले जाते. उत्तम शिक्षणासह येथे थोर संत हि होऊन गेले. मुकुंदराज महाराज समाधी मंदिर मराठीचे आद्यकवी म्हणून ओळखले जातात. तसेच दासोपंत समाधी स्थान व दासोपंतांची पासोडी दर्शन अंबाजोगाईत आल्यानंतर होते.
खड्गं पात्रं च मुसलं लांगलं च विभर्तीसा | अख्याता रक्तचामुंडा देवी योगेश्वरी तीच ||
(या वेदोक्त मंत्राने रोज एक माळ जप करावा) ॐ ऱ्हीं यं यां रुद्र देवत्यै योगेश्वर्ये स्वाहा |
देवीं भक्तजनप्रियां सुवदनां खड्गं च पात्रं तथा स्वर्णालंकृतलांगलंसुमुसलंहस्तैर्दधानां श्रियं | विद्युत्कोटीराविन्दुकांतिधवलां दंता सुरोन्मूलिनीम ब्रम्हेंद्राद्यभिवंन्दितां च वरदां योगेश्वरी संभजे ||
देवी योगेश्वरी स्वामिनी अज्ञ बाल मी तुझाच म्हणुनी | लाज राख तु माझी जननी देवी योगेश्वरी स्वामिनी || तुजवीण मज नच त्रिभुवनी मिळो आसरा तुझा निशिदिनी | हीच प्रार्थना अखंड चरणी देवी योगेश्वरी स्वामिनी ||
श्री योगेश्वरी देवीची आरती करुन मंत्रपुष्पांजलि झाल्यास गणपतीची,लक्ष्मीची,कन्याकुमारिकेची तसेच देवीची गायत्री म्हणतात रक्तचामुण्डायैच विद्महे | भुतसंहारिन्यैच धीमहि | तन्नो योगेश्वरी प्रचोदयात् ||
(देवी मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करताच हे ध्यान आपल्याला नजरेस पडते.) खड्गं पात्रं च मुसलं लांगलं च विभर्तीसा | अख्याता रक्तचामुंडा देवी योगेश्वरी तीच ||
योगेश्वरी देवी मातेच्या जन्मोत्सवाला मार्गशीर्ष शु.सप्तमी पासून सुरुवात होवून मार्गशीर्ष शु. पोर्णिमेला नवचंडी पाठाचे हवन होते व यादिवशी उत्सवाची सांगता होते.तसेच मार्गशीर्ष पोर्णिमा यादिवशी योगेश्वरी देवीच्या जय घोषात पालखी नगरप्रदक्षिणा करण्यास प्रस्तान करते.
श्री योगेश्वरी देवीचा अवतार स्वयंभु असून जागृत देळस्थान आहे .श्री योगेश्वरी देवी कुमारिका आहे .दंतासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी मार्गशीष पौर्णिमेला अवतार घेतला आहे . देवी कोकण वासीयांची कुलस्वामिनी असून अंबाजोगाईतील लोकांची ग्रामदैवत मानले जाते.
"योगेश्वरी देवी मातेचा नवरात्र उत्सवला अश्विन शु.प्रतिपदे पासून सुरुवात होवून अश्विन अष्टमीसह नवमीला हवन होते व अश्विन शु.दशमी (दसरा) यादिवशी उत्सवाची सांगता होते.तसेच यादिवशी देवीची पालखी नगरप्रदक्षिणा करते"अश्विन नवरात्र उत्सव (शारदीय नवरात्र)
"योगेश्वरी देवी मातेच्या जन्मोत्सवाला मार्गशीर्ष शु.सप्तमी पासून सुरुवात होवून मार्गशीर्ष शु. पोर्णिमेला नवचंडी पाठाचे हवन होते व यादिवशी उत्सवाची सांगता होते.तसेच मार्गशीर्ष पोर्णिमा यादिवशी योगेश्वरी देवीच्या जय घोषात पालखी नगरप्रदक्षिणा करण्यास प्रस्तान करते."मार्गशीर्ष नवरात्र (देवीचा जन्मोत्सव )
"श्री योगेश्वरी देवी मातेचा छबिना पालखी मंदिराच्या आतील बाजूस देवीची उत्सवमूर्ती पालखीत घेऊन भक्तांच्या उपस्थितीत देवीचा जय घोष करीत प्रदक्षिणा पूजा आरती करतात. हा कार्यक्रम प्रत्येक शुक्रवार व पोर्णिमा या काळात होतो."वार्षिक कार्यक्रम देवीचा छबिना पालखी
नवीन नवीन अपडेट्स साठी आपले संपूर्ण नाव व मोबाईल नंबर पाठवावा. आपल्याकडेहि काही नवीन कल्पना,माहिती, स्त्रोत्र असतील तर आम्हाला पाठवा.